मैथिलीने उंचावले मुरुम गावाचे नाव

करंजे- मुरुम (ता. बारामती) येथील मैथिली राजेंद्र कोरडे ही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 663 रॅकिंग मिळवून उत्तीर्ण झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा 2017 मध्ये झाली व याचा निकाल शुक्रवारी (दि.27) लागला. त्यात मैथिली कोरडेने घवघवीत यश मिळवल्याने तिच्या घरी अक्षरशः फटक्‍याची आतिषबाजी करून आनंद व्यक्‍त केला. मैथिलीने पुण्यातील महाविद्यालयातून इंजिनियरिंग केले आहे. तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तीने एका बॅंकेमध्येही नोकरी केली होती.

त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे. परिस्थितीची जाणीव आणि एकत्रित शेतकरी कुटूंब असून आई-वडिलांनी शेती व दुग्धव्यवसायावर संसाराचा हाकत असलेला गाडा डोळ्यासमोर ठेवत व ग्रामीण भागातील अडचणी ओळखून प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्धार तिने घेतला व सलाग तीन वर्षे अभ्यास करून हे घवघवीत यश संपादन केल्याने मुरूम ग्रामस्थांच्या वतीने तिचा लवकरच जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)