मैत्र जीवाचे…(प्रभात open house)

असा एक ही दिवस जात नाही ज्या दिवशी ‘मित्र’ हा शब्द मनात येणार नाही. प्रत्येकाला कोणी ना कोणी मित्र असतोच… व्यक्ती, प्राणी-पक्षी, पुस्तक, वृक्ष, वा तो कोणत्याही रुपात आसो.. माझ्या मते मैत्री-यारी हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जसं मिठाशिवाय जेवण अळणी-बेचव लागते.. त्याचप्रमाणे मित्राशिवाय जीवन निरस वाटते. प्रत्येकाला हक्काचे मित्र/मैत्रीण असतातच. मैत्रीची व्याख्या माझ्या मनात हीच आहे…

मैत्री ही निरागस, निस्वार्थ हवी.. की आपलेपणाची पाळेमुळे एखाद्याच्या मनात रुजवून त्याला प्रेमाचा अंकुर फुटतो… त्यात विश्वास आणि साथ लाभली की मग त्याचा वृक्ष होतो.. आणि त्या सुंदर मैत्र वृक्षाची फळे, सावली ही आपली सोबत नेहमी करते… मग उन, वारा, पाऊस याची आपल्याला भीती राहात नाही.. कारण त्या मैत्रीचा ओलावा हा सदैव आपल्या मनात सोबतीचा, प्रेमाचा गारवा आपल्याला देत असतो. आपल्या मैत्रीच्या आठवणींचा उजाळा नेहमीच आपली सोबत करत असतो….सुखात असेल तर, आनंदात मित्रच … आणि दु:खात असेल तर दु:ख निवारण्याचा मलम म्हणजे मित्रच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खऱ्या श्रीमंतीची व्याख्या करायची झाल्यास त्या व्यक्तीचे मित्रत्वाचे संबंध किती चांगल्या प्रकारे त्याने जोपासलेत यावर नक्कीच ठरेल. प्रत्येकाच्या मनात खास शब्द आहे मित्रासाठी… कोणाचा सखा, दोस्त …कोणाचा यार तर कोणाचा सोबती.. किती अर्थपूर्ण शब्द आहेत हे.. आपुलकीचे, प्रेमाचे प्रत्येकाला हवे-हवेसे वाटणारे. प्रत्येकाच्या मनावर हक्काने अधिराज्य गाजवणारे. कोणत्याही संकटसमयी न बोलता निरपेक्ष भावनेने साथ देणारे… वेळप्रसंगी चुकीच्या रस्त्याने जात असेल तर कानफटात वाजवून सही रस्ता दाखवणारे… किती काय बोलेल तेवढे कमीच आहे मित्रांबद्दल..

निखळ मैत्रीत ‘मी-मी’ राहात नाही तर ‘मी’ मित्रमय होऊन जातो…यासाठी मला कोणत्याही ठराविक दिवसाची अथवा वेळेची गरज वाटत नाही. असे जीवलग आठवताच ..’यार मेरी जिंदगी यारी मेरा इमान है’… हे गाणं आपोआप मनात गुणगुणू लागतं.

– जीत शिंदे,  पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)