मैत्री शब्दांत व्यक्त करता येत नाही…(प्रभात open house)

लहानपणीचा, शाळेचा, कॉलेजचा, कामावरचा ,शेजारचा अशा प्रकारचे मित्रांचे प्रकार साधारणपणे आपल्या मध्ये असतात. जवळचा, लांबचा, ओळखीचा असे पण मित्र असतात, परंतु यात धर्म फक्त मैत्रीचाच असतो .

‘प्रेमापेक्षा(प्रेम प्रकरण) मैत्रीचं नात चांगले आहे ना राव आपण मित्रच राहू ना’ .असं मुलींचं बोलणं आपण सर्वांनी ऐकलं असेलच….. असे का तर मैत्री या नात्यावर असणारा विश्वास.. प्रेमात कधी दुरावा येईल आणि ते कधी संपेल,आयुष्यभर राहील की नाही याचा भरोसा नसतो पण मैत्री एकदा केली की ती आयुष्यभरासाठी कायमची होऊन जाते, असा ठाम विश्वास आपल्यात आहे आणि तो खराच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मैत्रीला धर्म,जात, गरीब श्रीमंत अशी चौकट कधीच नसते. रक्ताच्या नात्यांपलीकडे जे असते ते मैत्री असते. या पेक्षा कोणतेच नाते इतके अतूट आहे असं तरी मला वाटत नाही.
एकदा माझा अपघात झाला, हे समजताच धनंजय फुले, दीपक लोंढे,अशोक बनसोडे धावतपळत मला पाहण्यासाठी आले, नुसते आलेच नाहीत त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पाण्यातले अश्रु सर्व काही सांगून गेले. यात कुठे शब्दांला जागा होती??
आपल्या सुखात सहभागी होऊन आनंद वाढवणारा ,दुःखातुन, संकटातून बाहेर काढणारा ही तोच असतो .या अशा प्रसंगावरून मित्र आपल्या आयुष्याचा व कुटूंबाचा भाग कधी बनून जातो हेच कळून सुद्धा येत नाही. माझ्या बहिणीच्या साखरपुड्याच्या समारंभात मला महत्वाच्या कामामुळे पूर्ण वेळ थांबता येणं शक्य नव्हते ,यावेळी दीपक लोंढे या मित्राने सर्व पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यापासून तर ते सोडण्यापर्यंत सर्व जबाबदारी स्वतःहुन घेतली होती .या वर काय बोलावे यासाठी माझ्याकडेच काय कोणाकडेच शब्द नसतील.. गणेश आंबेडकर, महेश बडे ,अशा अनेक मित्रांमुळे आयुष्याला समृद्धी येत आहे, असे मनापासून वाटते.  यासाठी शब्दच नाहीत म्हणून मैत्री शब्दात व्यक्त करता येत नाही…
सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 – अमोल अवचिते (खराडी, पुणे)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)