मैत्री नाकारल्याने तरुणीचा विनयभंग

पिंपरी – वारंवार मागणी करूनही तरुणीने मैत्री नाकारल्याने तिला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना भोसरी येथे घडली.

केतन रामदास जाधव (वय-30, रा. राम निवास, जाधव कॉलनी, पिंपरीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 20 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2018 ते 2 नोव्हेंबर 2018 या कालावधीत आरोपीने तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिच्याकडे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. मात्र तिने त्यास नकार दिला. ती तरुणी खरेदीसाठी गेली असता आरोपीने पुन्हा तिला रस्त्यात अडविले व मैत्रीची मागणी केली. तिने पुन्हा नकार दिला असता तिला शिवीगाळ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)