मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…(प्रभात open house)

‘मैत्री’ दोनच शब्द..  पण अवघं ब्रम्हांड कवेत घेण्याचं ज्यात सामर्थ्य आहे असे ते शब्द. मैत्रीची निश्चित व्याख्या सांगणं किंवा नेमक्या शब्दांत वर्णन करणं महाकठीण. मैत्री अंत:करणातून जोडली जाते. मैत्री ही निरंतर वाहणाऱ्या निर्झरासमान निर्मळ व तितकीच हळवी असते. वर्षा  ऋतूच्या  आगमनानंतर  येणार्‍या मातीच्या सुगंधासारखी, शीतल हवेच्या झुळूकासारखी व मनाला उभारी देणारी असते. 

कुणा विचारवंतानं म्हटलंय,
”The language of friendship is not words but meanings”
खरंच मैत्री ही निरपेक्ष असते, एकमेकांच्या सुख-दु:खात लोण्यासारखी मुलायम व उर्जा देणारी असते. मैत्री ही ठरवुन होत नाही, तिचे कसलेच नियम नसतात, अपेक्षा आणि उपेक्षा तर मुळीच नाही.
पण…सध्याच्या व्यापारी आणि स्वार्थी जगतात ती बऱ्याचदा  पारखून घ्यावी लागते. माणसे थोड्याशा फायद्यासाठी जवळ येतात आणि मतलब साधून दूरपण जातात. मग उरतात फक्त वेदना आणि पश्चाताप. जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्याचं मोल करता येत नाही, तो अनमोल ठेवा आहे.पण ती पारखण्याची खरी कसोटी असते,ज्याला ती साधली तो खरा भाग्यवंत.

-Ads-

आई आणि मुलगा या नात्यानंतर सर्वात विश्वसनीय आणि प्रेमाचे नाते म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे खांद्यावर हात आणि सदैव साथ. खरे मित्र जीवनाच्या वाटेवर साथ सोबत करतात, प्रसंगी रागवतात, समजूत काढतात, यशापयशाच्या गणिताचे मूक साक्षीदार बनतात.

– रवि शंकर तुपे, हडपसर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)