मैत्रीपूर्ण लढतीत भारताचा 2-1 ने पराभव

अमन: आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फूटबॉल सामन्यात अनुभवी सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला जॉर्डन विरुद्ध 2-1 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने लढाऊ वृत्त्तीने खेळ केला परंतु सामना बारबारीत सोडवण्यात देखील भारतीय संघाला यश येऊ शकले नाही. भारतासाठी एकमेव गोल पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या निशू कुमार ने लगावला.

विश्‍वचषक विजेते प्रशिक्षक मार्सेलो लोप्पी यांच्या चीनला बरोबरीत सोडवल्यानंतर आज पहिलाच अंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सत्रात जॉर्डनच्या आक्रमकांनी जेरीस आणले. भारतीय खेळाडूंनी पेनल्टी बॉक्‍समध्ये चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळ्याने जॉर्डन संघाला पेनल्टी बहाल करण्यात आली. परंतु, भारताचा गोलकीपर गुरप्रीत सिंग संधू याने उजवीकडे झेपावत सुंदर बचाव केला. पहिल्या सत्राच्या 25 व्या मिनिटाला सामान्यातलया पहिल्या गोलची नोंद झाली. जॉर्डनचा कर्णधार व गोलकीपर आमिर शाफीने स्वतःच्या बॉक्‍समधून मारलेलया कीकवर बॉल भारतीय गोलकीपरच्या पुढे पडला. गोल लाईन सोडून थोडा पुढे थांबल्याने त्याला बॉलचा उसळीचा अचूक अंदाज बांधता आला नाही आणि त्यामुळे गोल झाला.

दुसऱ्या सत्राची सुरुवात देखील जॉर्डनसाठी चांगली झाली. सामन्यातील 58 व्या मिनिटाला त्यांच्या आक्रमकांनी रचलेल्या चालीचे एहसान हदादने गोलमध्ये रूपांतर करत जॉर्डनला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने आक्रमक चाल रचली आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या निषु कुमारने 61 व्या मिनिटाला गोल करत जॉर्डनची आघाडी 2-1 अशी कमी केली. त्यानंतर भारतीय संघाने आपला खेळ आणखी उंचावला. परंतु, त्यांना अनेक आक्रमक चाली रचूनही गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे भारताला या सामन्यात 2-1 असे पराभूत व्हावे लागले. भारतीय संघ फिफा रॅंकिंगमध्ये 97व्या स्थानी आहे तर जॉर्डनचा संघ 112व्या क्रमांकावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)