मैत्रीणीवर बलात्कार करुन इमारतीवरुन खाली फेकले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रोहिणीमधील बेगमपूर भागात एका युवकाने २० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करुन नग्न अवस्थेत चौथ्या माळ्यावरुन फेकून दिल्याचे समोर आले आहे . युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण आजुबाजुचे लोकं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. युवतीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून आरोपीला अटक करण्यात आली.
युवती आणि युवक एकाच ठिकाणी कामाला होते. गुरुवारी युवकाने मित्रांसोबत भेटण्याचा प्लॅन केला. पीडित युवतीसह एक मुलगा आणि एक आणखी युवती होते. पण चौघेही एकाच गाडीवर होते म्हणून पोलिसांनी त्यांची गाडी जप्त केली. त्यानंतर चौघेही रिक्षाने घरी जायला निघाले. आरोपीने दारुच्या नशेत युवतीला रिक्षातून उतरले आणि वडिलांची गाडी घेऊन तिला घरी सोडतो असे सांगितले. त्यानंतर इतर दोघे रिक्षानेच घरी निघून गेले. आरोपी युवतीला घेऊन त्याच्या घरी आला. त्यानंतर तिच्यावर त्याने बलात्काराचा प्रयत्न केला आणि मारहाण देखील केली. सध्या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती खूपच नाजूक असल्याचे डॉक्टांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)