मैत्रीणीला माहराण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक

मुंबई – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपली मैत्रीण निरू रंधावा हिला मारहाण केल्याप्रकरणी अखेर अभिनेता अरमान कोहलीला अटक करण्यात आली आहे. लोणावळा येथील त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून त्याला पोलिसांनी गजाआड केले. निरुने तक्रार दाखल केल्यापासून अरमान फरार होता.

याप्रकरणी गेल्या रविवारी अरमानविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अरमानने केलेल्या मारहाणीत निरु रंधावाला गंभीर इजा झाली असून उपचारासाठी तिला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघेही 2015 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

-Ads-

निरुने तक्रार दाखल केल्यापासून अरमान फरार होता. चौकशीसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याच्या वडिलांशीही पोलिसांनी संपर्क साधला असता आपल्याला काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर लोणावळा येथून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, एका क्षुल्लक गोष्टीवरून अरमान आणि निरुमध्ये भांडण झाले होते आणि त्यानंतर रागाच्या भरात अरमानने तिला बेदम मारहाण केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)