मैत्रिणीला धमकावून उकळले पैसे

सांगवी – मैत्रिणीला धमकावून एका तरुणाने पैसे उकळल्याचा प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. दरम्यान, शरीरसंबंधास नकार दिल्याने तरुणाने पैसे उकळल्याची माहिती पुढे येत आहे.

याप्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 19 वर्षाच्या तरुणाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगी आणि 19 वर्षीय मुलगा एका खासगी शिकवणीला एकत्र होते. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री होती. मुलाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

मुलीने नकार दिल्याने तरुणाने तिच्याकडे पैशांची मागणी केली. मुलीने भीतीपोटी या तरुणाला एकदा 10 हजार आणि दुसऱ्यांदा 15 हजार असे एकूण 25 हजार रुपये दिले होते. तरीही, तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे या मुलीने पोलिसात धाव घेत त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे, पोलिसांनी सांगितले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)