मे महिन्यात साताऱ्यात ‘राजधानी सातारा महोत्सव’

संग्रहित छायाचित्र

सातारा: उदयनराजे भोसले फौंडेशन ऑफ कल्चरल अॅक्‍टिव्हिटी व पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीच्यावतीने 25 ते 27 मे दरम्यान ‘राजधानी सातारा महोत्सव’ होणार आहे.
याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. नगराध्यक्षा माधवी कदम, माजी सभापती सुनील काटकर, संग्राम बर्गे, गीतांजली कदम, माजी नगरसेवक रविंद्र झुटींग, नगरसेवक सागर साळुंखे यावेळी उपस्थित होते.

त्यांनी सांगितले, “महोत्सवातील कार्यक्रम अजिंक्‍यतारा, शाहू स्टेडियम येथे होणार आहे. यामध्ये मर्दानी खेळ, रॉक बॅन्ड, मराठी सारेगमपाचे सिंगर्स कला दाखवणार आहेत. तिस-या दिवशी भव्य आणि दिव्य असा सातारा गौरव पुरस्कार सोहळा होणार आहे.”

ता. 25 मे रोजी अजिंक्‍यता-यावर शिवशाही दर्शन घडवणारा शिवजागर कार्यक्रम होईल. यात छत्रपती शिवरायांची जीवनगाथा, लाठीकाठी खेळ, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, दांडपट्टा असे मर्दानी खेळ असतील. ता. रोजी साता-यात पहिल्यांदाच भारतातील पहिला वहिला मराठी रॉक बॅण्ड मोक्ष या रॉक बॅण्डचा कार्यक्रम शाहू स्टेडियम येथे भव्यदिव्य स्टेजवर होणार आहे. त्याचबरोबरीने अनेक मराठी वाहिनीवर आपल्या आवाजाचा ठसा उमटवणारे अनेक कलाकर देखील यानिमित्ताने सातारकरांचे प्रत्यक्ष आकर्षण ठरणार आहेत.

ता. 27 मे रोजी साता-यातील गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. वेगळा आदर्श निर्माण करणा-या नामवंताचा सातारा गौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. एकूण 13 पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात शिवसन्मान पुरस्काराचा समावेश आहे. हा सोहळा शाहू स्टेडियमवर सायंकाळी होईल. सातारकरांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)