मेहेरनजर…?? 

कोणीतरी कोणावर तरी मेहेरनजर करायलाच पाहिजे. सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ताशेरे मारून, स्वयंसेवकांचा पाणउतारा करून, त्यांची उपेक्षा करून तुम्हाला काय मिळणार आहे, आसुरी आनंदच ना! संघ स्वयंसेवकांनी आणीबाणीतच काय पण स्वातंत्र्याच्या चळवळीतसुद्धा प्राण पणाला लावून कार्य केले, अतोनात कष्ट केले, अगदी पूर, भूकंप, इतर आपत्ती यातसुद्धा नागरिकांना मदतच केली. त्याकाळी भाजप सरकार नव्हते. कॉंग्रेसचे सरकार होते. तरी पण दुजाभाव न ठेवता संघाच्या स्वयंसेवकांनी जात, धर्म कशाचाही विचार न करता माणुसकीच्या भावनेतून समाजाला मदत केली. त्याबद्दल वेळोवेळी तुरूंगवासही पत्करावा लागला आणि आता “आणीबाणीची पेन्शन ही संघावर मेहेरनजर म्हणणाऱ्यांच्या पोटात दुखू लागले.

बरोबर आहे, ऊठसूठ संघावर खोटे-नाटे आरोप करणारे हे लोक आणखी काय करणार. वाः रे नेते! नेत्यांनी नेत्याप्रमाणे वागावे, दुसऱ्याच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, त्यांचा पाणउतारा करून स्वतःचा स्वार्थ जपू नये मग ते नेतृत्व स्वार्थी नेतृत्व होते असे वाटते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात उसळलेल्या दंगलीत एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून, त्यांना देशोधडीला लावूनही त्या समाजाने आजवर आरक्षणाची किंवा सोयी-सवलतींची कसलीही मागणी केलेली नाही, ना त्यावेळच्या जाळपोळीचे पंचनामे झाले, ना कुणाला नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे उठसूट कोणाला तरी सतत लक्ष्य करण्याची सवय सोडून दिली पाहिजे.
– गोपाळ द. संत, पुणे 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)