मेहुल चोक्‍सीला जमावाकडून मारहाणीची भिती

…त्यामुळे भारतात येत नसल्याचा दावा
नवी दिल्ली – पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या निरव मोदीचा मामा मेहुल चोक्‍सीने आपल्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द व्हावा या साठी सीबीआय कोर्टात अर्ज केला असून या अर्जात त्याने आपण देशात आल्यास आपल्याला जमावा कडून मारहाणीची भीती असून त्यामुळे माझा मृत्यु होईल अशी मला भीती आहे त्यामुळे देशात येत नाही असे त्याने अर्जात नमूद केले आहे.

अर्जात पुढे त्याने असे म्हटले आहे की, भारतात परतलो तर जमावाकडून मारहाण होईल अशी भीती वाटते आहे. या भीतीमुळेच भारतात परतणे धोकादायक वाटते आहे तसेच भारतात एखाद्या प्रकरणात दोषी सापडलेल्या माणसाला जमावाकडून मारहाण करण्यात येते, अशा काही घटना गेल्या काही दिवसात उघड झाल्या आहेत. मला अशा घटनेत सापडून मरायचे नाही, पीएनबी घोटाळ्यात मेहुल चोक्‍सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू करण्यात आले आहे. हा वॉरंट रद्द व्हावा म्हणून सीबीआय कोर्टात मेहुल चोक्‍सीने अर्ज दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

12 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा करून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी हे फरार झाले आहेत. भारतातील अनेक लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे असेही चोक्‍सीने यात सांगितले आहे.
मेहुल चोक्‍सीने त्याचे वकिल संजय अबॉट आणि राहुल अग्रवाल यांच्या मदतीने कोर्टात अजामीनपात्र वॉरंट रद्द केले जावे यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आपली तब्बेत बरी नसल्याचेही चोक्‍सीने म्हटले आहे. तपास यंत्रणा माझ्यासोबत भेदभाव करत आहेत असा आरोपही त्याने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)