मेहुल चोक्‍सीच्या प्रत्यार्पणासाठी ऍन्टिग्वाला विनंती 

नवी दिल्ली: पंजाब बॅंक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या प्रत्यार्पणासाठी आज ऍन्टिग्वा देशाला विनंती करण्यात आली. चोक्‍सीने नुकतेच ऍन्टिग्वाचे नागरिकत्व मिळवले आहे. चोक्‍सीला ताब्यात घेण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे पथक ऍन्टिग्वा येथे रवाना करण्यात आले आहे. या पथकाने काल ऍन्टिग्वाच्या विदेश मंत्र्यांची भेट घेतली आणि चोक्‍सीला भारताच्या ताब्यात देण्याबाबतची विनंती केली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
मेहुल चोक्‍सी हा पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये 2 अब्ज डॉलरचा गैरव्यवहार करणाऱ्या नीरव मोदी या फरार प्रमुख आरोपीचा मामा आणि एक अन्य आरोपी पैकी एक आहे. सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्यावतीने पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहाराचा तपास सुरू असून या दोन्ही तपास संस्थांसाठी चोक्‍सी “वॉन्टेड’ आहे.
ऍन्टिग्वाचे नागरिकत्व मिळण्याबाबत चोक्‍सीने 2017 साली मे महिन्यात केलेल्या अर्जाला भारताकडून आक्षेप घेतला गेला नव्हता. त्यामुळे ऍन्टिग्वा येथील प्रशासनाने नोव्हेंबर 2017 मध्ये चोक्‍सीला नागरिकत्व दिले आहे. चोक्‍सी यावर्षी 4 जानेवारी रोजी भारतातून पळून गेला आणि 15 जानेवारी रोजी त्याने ऍन्टिग्वाच्या नागरिकत्वाची शपथ घेतली. चोक्‍सीच्या पार्श्‍वभुमीविषयी कल्पना असती, तर त्याला ऍन्टिग्वाचे नागरिकत्व दिले गेले नसते असे तेथील विदेश मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. ऍन्टिग्वा आणि बारबुडा येथील नागरिकत्वाच्या अटीनुसार तेथे किमान 1 लाख डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्‍तीला नागरिकत्व दिले जाते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)