मेहुल चोक्सीला भारतात पाठवणार नाही – अँटिग्वा सरकार 

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत.  परंतु, मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे आता अवघड झाले आहे. कारण, अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एका वृत्तवाहिनीवर बोलताना अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी सांगितले की, चोक्सी आता अँटिग्वाचा नागिरक आहे आणि इथले सरकार त्याची नागरिकता हिसकावून घेऊ शकत नाही. तसेच भारत सरकारचे कोणी अधिकारी आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी आले असल्याची आपल्याला माहिती नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, काही माध्यमांच्या  वृत्तानुसार, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीचे अधिकारी अँटिग्वा झाले असून त्यांना आणण्यासाठी  भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)