‘मेहबुबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री’

कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचे वादग्रस्त विधान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी केलं आहे. मुख्यमंत्री आपल्या इस्लामी अजेंड्याच्या माध्यमातून हिंदूबहूल जम्मूमध्ये लोकसंख्येत बदल घडवू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अंकुर शर्मा असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वकिलाचे नाव आहे.

-Ads-

एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना अॅड. अंकुर शर्मा म्हणाले, मेहबूबा मुफ्ती या एक जिहादी मुख्यमंत्री आहेत. त्या गोहत्येसाठी कत्तलखाने आणि गोवंशाच्या तस्करीला कायदेशीर संरक्षण देत आहेत. जम्मू हिंदू बहूल ठिकाण आहे. या ठिकाणी मुस्लिमांना जमिनी देऊन त्यांचे बस्तान बसवले जात आहे. जम्मूची हिंदू बहूल ओळख पुसली जावी यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. अंकुर शर्मा हे कथुआ सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी संजीराम यांचे वकिल आहेत. संजीराम हा या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे क्राईम ब्रांचने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)