मेहबुबा मुफ्तींनी मानले सचिनचे आभार

शाळेच्या इमारतीसाठी दिला 40 लाखांचा निधी
श्रीनगर – जम्मू काश्‍मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यात एका शाळेच्या इमारत उभारणीसाठी राज्यसभेचे खासदार असताना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने खासदार फंडातून चाळीस लाखांचा निधी दिला होता. त्यामुळे हे काम लवकर होऊ शकले आहे त्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ट्विटर संदेशात त्यांचे आभार मानताना त्यांनी म्हटले आहे की मैदानाच्या बाहेरची तुमची कामगीरीही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या निधीतून द्रुगमल्ला येथे शाळेच्या दहा वर्ग खोल्या, चार प्रयोग शाळा, आणि सहा टॉयलेट्‌सह प्रशासकीय विभागाचेही बांधकाम करण्यात आले आहे. तेथे इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग चालवले जात असून तेथे एक हजार विद्यार्थी शिकत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)