मेहता, देसाई आणि खडसेंना वेगळा न्याय का ?- अशोक चव्हाण

औरंगाबाद- ताडदेव SRA प्रकल्पाच्या घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता सुभाष देसाई आणि  एकनाथ खडसे यांना वेगवेगळे न्याय का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. या तिघांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तमार्फत चौकशी लावली, कारण लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लावला आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ते औरंगाबादेत येथे आले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सुभाष देसाई, प्रकाश मेहता, एकनाथ खडसे यांना वेगवेगळे न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गोरखपूर दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. गोरखपूर दुर्घटनेस पूर्णपणे उत्तर प्रदेश सरकार अणि वैद्यकीय हॉस्पिटलचे प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मोहन प्रकाश, रजनी पाटील, अब्दुल सत्तार, नामदेव पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)