मेस, हॉटेल बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल

चहा, नाश्‍तादेखील मिळाला नाही

पुणे- शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे व चाकरमान्यांचे गुरूवारी चांगलेच हाल झाले. खानावळी, हॉटेल व खाण्याची छोटी मोठी दुकानेही बंद असल्याने अनेकांना उपलब्ध असलेल्या फरसाण-चिवड्यावरच दिवस काढावा लागला.

पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आलेले आहेत. त्यातील बहुतांशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. या सर्वांच गुरुवारी मेस व कॅन्टिन बंद असल्याने उपासमार सहन करावी लागली. तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात वास्तव्यास असणारी अनेक मुलांसाठी असणारा रोजचा नाश्‍त्याचा स्टॉल, जेवणाचे हॉटेल बंद असल्याने मिळेल त्यावर भागावावे लागले. विद्यार्थी कुलदीप आंबेकर म्हणाला, आम्हाला साधा चहासुद्धा सकाळपासून मिळालेला नव्हता. सकाळच्या वेळेत काही दुकाने सुरू होती, मात्र बाइकस्वारांनी येऊन ती दुकानेही बंद करायला लावल्याने आम्हाला दिवसभर काही मिळते आहे का, हे पहाण्यासाठी भटकावे लागले. ज्या मुलांचे पुण्यात नातेवाईक होते ती मुले त्यांच्याकडे गेली. मात्र, ज्यांचे कोणीच नाही अशांचे मात्र आतोनात हाल झाले.
दरम्यान संध्याकाळच्या वेळी वातावरण निवळलेले पहायला मिळाले. रस्त्यावर वर्दळ वाढल्यामुळे अनेकांनी वसतिगृहातून बाहेर येत खाण्यापिण्याच्या दुकानांचा शोध सुरु केला. एक एक करत हळूहळू सर्व खाण्यापिण्याची दुकाने सुरु झालेली पहायला मिळाली. अनेक मेस व हॉटेलचालकांनी संध्याकाळच्या वेळी हॉटेल सुुरु केल्याने त्या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडालेली पहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)