मेल हॅक करुन 72 हजारांना गंडा

हिंजवडी – आयटी पार्क येथील एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणास ऑनलाइन 72 हजारांचा गंडा घालण्यात आला.

या प्रकरणी संतोषकुमार ब्रम्हराऊत (वय-33, रा. मुळशी, जि.पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसहा ते सहाच्या दरम्यान ऑनलाइनच्या माध्यमातून अज्ञात आरोपींनी संतोषकुमार यांच्या खात्यातून 72 हजार 706 रुपये काढून घेतले. मोबाईलवरुन फोन करणाऱ्या आरोपींनी संतोषकुमार यांचा विश्‍वास संपादन करुन काही माहिती मिळवली, त्यानंतर त्यांचे ई-मेल अकाउंट “हॅक’ करुन त्यांच्या खात्यावरुन परस्पर पैसे काढत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)