मेलॅनोमा अर्थात त्वचेचा कर्करोग (भाग एक )

कोवळा सूर्यप्रकाश आरोग्याला कितीही चांगला असला तरी प्रखर सूर्यप्रकाश आरोग्याला घातक आहे. उन्हात जास्त वेळ फिरल्याने त्वचेला सुरकुत्या पडतात. त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.
मेलॅनोमा अर्थात त्वचेचा कर्करोग

आपल्याला एक जीवनसत्व अगदी सहज आणि कसलाही खर्च न करता मिळते. ते म्हणजे जीवनसत्व डी. कोवळ्या उन्हात म्हणजे सकाळी सूर्योदयानंतरच्या उन्हात हे जीवनसत्व डी असते. म्हणून लहान मुलांना रिकेटसिया अर्थात मुडदूस हा जीवनसत्व डी च्या अभावामुळे होणारा रोग होऊ नये म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळू द्यायला हवे.

सूर्यप्रकाशामध्ये अतीनील म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणे (युव्ही) असतात. ती जास्त घातक असतात. या युव्ही किरणांमुळेच त्वचेच्या पेशी जळून जातात. उन्हात बराचवेळ फिरून आल्यावर त्वचेचा रंग काळा पडतो. त्याला त्वचा रापणे असे म्हणतात. हा काळेपणा काही तासांनी निघून जातो; परंतु कडक उन्हात बराचवेळ किंवा बरीच वर्षे काम केल्याने, पायी प्रवास केल्याने अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेच्या पेशींमध्ये शिरून त्यांचा नाश करतात आणि कधीकधी तर कॅन्सर होण्याचाही धोका असतो. उन्हात जाऊन आल्यावर एखादेवेळेस त्वचा रापली तर फारसे काळजीचे कारण नसते; परंतु हे रापणे अतिशय तीव्र स्वरूपाचे असेल तर ते कॅन्सर होण्याला निमित्त ठरू शकते.

आपल्याला एक जीवनसत्व अगदी सहज आणि कसलाही खर्च न करता मिळते. ते म्हणजे जीवनसत्व डी. कोवळ्या उन्हात म्हणजे सकाळी सूर्योदयानंतरच्या उन्हात हे जीवनसत्व डी असते. म्हणून लहान मुलांना रिकेटसिया अर्थात मुडदूस हा जीवनसत्व डी च्या अभावामुळे होणारा रोग होऊ नये म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळू द्यायला हवे. सूर्यप्रकाशामध्ये अतीनील म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणे (युव्ही) असतात. ती जास्त घातक असतात. या युव्ही किरणांमुळेच त्वचेच्या पेशी जळून जातात. उन्हात बराचवेळ फिरून आल्यावर त्वचेचा रंग काळा पडतो. त्याला त्वचा रापणे असे म्हणतात. हा काळेपणा काही तासांनी निघून जातो; परंतु कडक उन्हात बराचवेळ किंवा बरीच वर्षे काम केल्याने, पायी प्रवास केल्याने अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेच्या पेशींमध्ये शिरून त्यांचा नाश करतात आणि कधीकधी तर कॅन्सर होण्याचाही धोका असतो. उन्हात जाऊन आल्यावर एखादेवेळेस त्वचा रापली तर फारसे काळजीचे कारण नसते; परंतु हे रापणे अतिशय तीव्र स्वरूपाचे असेल तर ते कॅन्सर होण्याला निमित्त ठरू शकते.

मेलॅनोमा अर्थात त्वचेचा कर्करोग

त्वचेच्या कॅन्सरला मेलॅनोमा असे म्हणतात. हा कॅन्सर प्राणघातक असतो. हा मेलॅनोमा कुणालाही आणि कोणत्याही वयात म्हणजे पुरुष, मुले तरुण आणि वृध्द कुणालाही होऊ शकतो. हा त्वचेचा कॅन्सर शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरू शकतो.
त्वचेचा कॅन्सर साधारणपणे सतत त्वचा जेथे उघडी राहते अशा चेहरा, कान आणि मान या भागातल्या त्वचेला होण्याचे प्रमाण जास्त आहे. सुदैवाने या प्रकारचा कॅन्सर शरीरात पसरत नाही. पण त्वचेचा वाढलेला भाग मात्र सतत ऑपरेशन करून काढावा लागतो. त्वचेच्या पेशींचे थरानुसार अनेक प्रकार असतात. त्यापैकी स्कॅमस नावाच्या पेशींचा कॅन्सर योग्य उपचार झाले नाहीत तर शरीरात इतर भागात पसरू शकतात.

काळजी केव्हापासून घ्यावी?

अगदी लहानपणापासून काळजी घ्यायला हवी. आपल्या आयुष्यापैकी पहिल्या 18 वर्षांत आपल्याला सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात मिळतो. कारण ही वर्षे बाहेर खेळण्याची आणि हिंडण्या-फिरण्याची असतात. नोकरी व्यवसायात गुंतल्यानंतर, फिरतीचा व्यवसाय सोडल्यास आपले बहुतेक जीवन घरात किंवा ऑफीसमेध्यच जाते. म्हणून त्वचेच्या कॅन्सरचा धोका मुलांना आणि किशोरांनाच जास्त असतो.

काळजी कशी घ्यावी?

दुपारच्या कडक उन्हात मुलांना खेळू देऊ नये.
सूर्यप्रकाशरक्षक (सन ब्लॉक) वापरावा. एसपीएफ 15 किंवा त्यापेक्षा जास्त प्रतीचा वापरावा.
उन्हात जाताना कपडे पांढऱ्या रंगाचे आणि सैल असावे.
नेहमी टी शर्ट आणि हॅट वापरावी.
युव्ही किरणांपासून त्वचेला किती धोका असतो हे मुलांना सोप्या शब्दात समजावून सांगावे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)