मेलबर्नमधील चाकू हल्ल्यात तिघांना भोसकले 

मेलबर्न – मेलबर्नमध्ये एका माथेफिरूने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये तिघाजणांना भोसकण्यात आले. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोराने एक कारही पेटवून दिली आहे. या हल्लेखोराला पोलिसांनी गोळी घालून ठार मारले. हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे व्हिक्‍टोरिया पोलिस प्रमुख ग्रॅहम ऍश्‍टन यांनी म्हटले आहे.

मेलबर्नमधील अत्यंत रहदारीच्या बर्क रस्त्यावर भर दिवसा हा थरार घडला. हल्लेखोराने एक कार पेटवून दिल्याचे समजल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यादरम्यान या हल्लेखोराने तिघांवर चाकूने वार केले होते. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. हल्लेखोर युवक हा 22 वर्षीय बेकार युवक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मत्र उपचारादरम्यान तो मरण पावला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून दहशतवदी हल्ल्याप्रमाणे या घटनेकडे बघितले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)