मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल

नवी दिल्ली: नवी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत भारतीय बॉक्‍सर मेरी कोम हिने 48 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते. या विजेतेपदाबरोबर जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तिने केला होता. त्यानंतर मेरी कोम हिने जागितक बॉक्‍सिंग क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

गत वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत मेरी कोमने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते. तिच्या या कामगिरीमुळे ती या स्पर्धेतील सर्वात यशस्वी बॉक्‍सिंगपटू ठरली आहे. एआयबीएने जाहीर केलेल्या क्रमवारीत 1700 गुणांसह मेरी कोम पहिल्या स्थानावर पोहचली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेरी कोमसह भारताच्या पिंकी जांगरा हिने 51 किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर आशियाई खेळात रौप्य पदक मिळवणाऱ्या मनीषा मौन हिने 54 किलो वजनी गटात आठवे स्थान पटकावले आहे. तर, सोनिया लाथर हिने 57 किलो वजनी गटात दुसरे स्थान पटकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)