मेरी कोमने आयओएस कंपनीसोबतचा करार वाढवला 

नवी दिल्ली: भारताची सहावेळची जगजेत्ता महिला बॉक्‍सर मेरी कोमने तिचे क्रीडा व्यवस्थापन करणाऱ्या “आयओएस’ या कंपनीशी दहा वर्षे करार वाढवला आहे. हा करार तिने सहावे विश्वविजेतेपद पटकाविल्यानंतर वाढवला. ही कंपनी 2009 पासून मेरी कोमसाठी व्यवस्थापनाचे काम करत आहे.

हा करार वाढवल्यावर मेरी कोमने सांगितले की, मागील 10 वर्षात मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले आहे. बाकी सर्व व्यावसायिक गोष्टी माझ्या टीमने व्यवस्थीत सांभाळल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचे हे नाते वाढण्याचा निर्णय घेतला आहे. मी पुन्हा पूर्णपणे माझ्या खेळावर लक्ष देणार आहे तर आयओएसने माझे व्यावसायिक काम त्याच जोमाने पाहावे अशी आशा आहे, असेही तिने यावेळी नमूद केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)