मेदनकवाडीतून सव्वादोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

वाकी – मेदनकरवाडी (ता. खेड) येथील एका घरात मंगळवारी (दि. 15) प्रवेश करुन बेडरुमधील कपाटील चावी काढून चोरट्यांनी भरदिवसा रोख रकमेसह तब्बल सव्वादोन लाख रुपये किमतीच्या महागड्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आज (बुधवारी) अज्ञात चोरट्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सुनील दिनकर शेवरे (वय 26, सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. माळेगाव, पो. तांदूळवाडी, ता. जि. जळगाव) असे ताब्यत घेण्यात आलेल्याचे नाव आहे. तर नवनाथ साहेबराव मेदनकर (वय 36, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेदनकर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत मेदनकरवाडी येथे राहत असून, त्यांचा प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय आहे. मेदनकरवाडी येथे मंगळवारी
(दि. 15) दुपारी एक ते सायंकाळी आठच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मेदनकर यांच्या घरात प्रवेश केला. व हॉलमध्ये असलेल्या कपाटाच्या आतील बेडरूम मधील कपाटाची चावी काढून कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये 2 लाख 25 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू मोरे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)