मेदनकरवाडी येथे हरीनाम सप्ताहास प्रारंभ

वाकी- ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष, टाळमृदंगाच्या गजरात मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये अखंड हरीनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला असून, या सोहळ्यानिमित्त सकाळी काकडा आरती, विष्णू सहस्रनाम, श्री ज्ञानेश्‍वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन हरिजागर तसेच महाप्रसादाचा भाविक लाभ घेत आहेत. हभप रामहरी महाराज, महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या आशीर्वादाने, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले व मंडळाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष हभप हरिदास जोगदंड यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे चार ते सकाळी सहा या वेळात काकडा, त्यानंतर विष्णूसहस्रनाम, ज्ञानेश्‍वरी मेदनकर, बप्पासाहेब जोगदंड, अरुण कुसाळकर, विनोद महाळुंगकर, राहुल नायकवाडी, विजय पवार, मुक्‍ताजी नाणेकर, प्रकाश वाडेकर, शांताराम मेदनकर, संजय चाबुकस्वार, दत्तात्रय भुजबळ आदींच्या हस्ते कलश पूजन, तर अमृत शेवकरी, भगवान मेदनकर, जया मोरे, शुभांगी पठारे, जितेंद्र पटेल, जीवन सोनवणे आदींच्या हस्ते विणा पूजन करण्यात आले. त्यानंतर माधव मनोरे, कृष्णा भुजबळ, देवीदास खोंड, सुरेश कानडे यांच्या हस्ते ज्ञानेश्‍वरी पूजन करण्यात आले. सायंकाळी हभप शंकर महाराज ननवरे यांचे प्रवचन, व हभप विष्णुपंत महाराज लोंढे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)