मेथी, कांदापातच्या भावात वाढ : उर्वरित सर्व पालेभाज्या स्थिर

पुणे – आवक घटल्याने मेथी आणि कांदापातच्या भावात शेकडा जुडीमागे अनुक्रमे 300 आणि 200 रुपयांनी वाढ झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे कोथिंबिरीसह उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
मेथीची गेल्या रविवारी 1 लाख जुडी आवक झाली होती. तर आज निम्म्याने कमी म्हणजे केवळ 50 हजार जुडीच आवक झाली आहे. त्यामुळे शेकडा जुडीमागे मेथीच्या भावात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. मेथीला घाऊक बाजारात प्रती जुडीस 5 ते 9 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात जुडीसाठी 10 ते 15 रुपये मोजावे लागत आहेत. कोथिंबिरीची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात 1 लाख 75 हजार जुडी आवक झाली होती. तर आज सुमारे 2 लाख जुडी आवक झाली आहे. कोथिंबिरीला घाऊक बाजारात 2 ते 5 रुपये आणि किरकोळ बाजारात 8 ते 10 रुपये मोजावे लागत आहेत. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 200-500, मेथी : 500-900, शेपू : 300-500, कांदापात : 500-800, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 300-400, अंबाडी : 400-500, मुळे : 500-800, राजगिरा : 400-500, चुका : 400-600, चवळई : 500-600, पालक : 400-600.
———


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)