मेथी, अंबाडीच्या भावात वाढ : तर कोथिंबिर, शेपू कांदापातच्या भावात घसरण

पुणे – मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने घाऊक बाजारात मेथीच्या भावात शेकडा जुडीमागे 200, तर अंबाडीच्या भावात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे आवक जास्त झाल्याने कोथिंबीर, शेपू आणि कांदापातच्या भावात प्रत्येकी 100 रुपयांनी घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजाबळ यांनी दिली.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात मागील रविवारी (दि. 5 ऑगस्ट) मेथीची 50 हजार जुडी आवक झाली होती. तर त्यामध्ये घट होऊन आज 40 हजार जुडी आवक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मेथीच्या भावात जुडीमागे 2 रुपयांनी वाढ झाली आहे. जुडीस 8 ते 11 रुपये मोजावे लागत असून, किरकोळ बाजारात मेथीच्या जुडीची 15 ते 20 रुपयांनी विक्री होत आहे. तर कोथिंबिरीची आवक तब्बल 50 हजार जुडींनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात दोन लाख जुडी आवक झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन आज अडीच लाख जुडीची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात 2 ते 4 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात जुडीसाठी 8 ते 10 रुपये मोजावे लागत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 200-400, मेथी : 800-1100, शेपू : 200-400, कांदापात : 500-700, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 300-400, अंबाडी : 500-600, मुळे : 500-800, राजगिरा : 400-500, चुका : 500-600, चवळई : 500-700, पालक : 500-600.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)