मेढ्यात भरणार वारकऱ्यांचा मेळा

-जावळी युवक वारकरी संघातर्फे संत मुक्ताई महोत्सवाचे आयोजन
-महोत्सवाचे उद्‌घाटन आ. शिवेंद्रराजे व पार्टे (गुरुजी) यांच्या हस्ते होणार

मेढा – वै. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे व वै. ह. भ. प. भिकोबा महाराज देशमुख यांच्या आशीर्वादाने आणि जावळी तालुका युवक वारकरी संघातर्फे दि. 7 ते 10 डिसेंबर दरम्यान पोलीस परेड मैदान मेढा येथे भव्य आदीशक्ती संत मुक्ताई माऊली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्‌घाटन आ. शिवेंद्रराजे भोसले आणि प्रसिद्ध उद्योजक ह.भ.प. एस. एस. पार्टे (गुरुजी) यांच्या हस्ते होणार असून खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे.या महोत्सवाच्या व्यासपीठाचे पूजन 7 रोजी दुपारी 3 वाजता अनेक मान्यवर आणि महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ सातारामधील सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच सातारा जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या महोत्सवामध्ये दि. 7 रोजी 6 ते 9 या वेळेत संत मुक्ताई माऊली चरित्र कथा, मुक्ताई फडावरील ख्यातनाम मुक्ताई चरित्र कथा, प्रवक्ते ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्यातर्फे तर दि. 10 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत किर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे (गेवराई) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच उपस्थित सुवासिनींचा हळदी-कुंकू व साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये जावळी तालुक्‍यातील 25 ज्येष्ठ वारकऱ्यांना वारकरी सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दि. 10 रोजी दुपारी 1 ते 3 वा. सातारा जिल्ह्यात प्रथमच संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्‍वासह अर्थात साक्षात माऊलींचे दर्शन व भव्य दिंडी सोहळा आणि रिंगण सोहळा पार पडणार आहे. तसेच या लक्षवेधी सोहळ्याला सर्व वारकऱ्यांनी उपस्थितीत रहाण्याचे आवाहन जावली तालुका युवक वारकरी संघातर्फे करण्यात
आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)