मेढ्यात बालविवाह पडला महागात

वधू-वराकडील मंडळींवर गुन्हा दाखल; आठ जणांना अटक
मेढा, दि. 12 (प्रतिनिधी)- मेढा, ता. जावली येथे गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एक विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यावेळी वधू अल्पवयीन होती या बाबतची माहिती सर्वांना असूनही लग्न लावून देण्यात आले होते. याप्रकरणी एका सामाजिक संस्थेच्या मदतीने वधुने शुक्रवारी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वधू आणि वर पक्षातील सत्तावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जावलीत असे विवाह झालेल्यांची झोप उडाली आहे. या प्रकरणातील वर्‍हाडी मंडळी व शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्यांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सपोनि. जीवन माने यांनी सांगितले
मेढ्यातील एका मंगल कार्यालयात 23 नोव्हेंबरला हा विवाह सोहळा पार पडला. यातील विवाहित मुलीचे वय 16 वर्षांच्या दरम्यान होते. याची सर्व माहिती वर आणि वधू पक्षाच्या लोकांना माहित होती. तरीही लग्न लावून देण्यात आले होते. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने मुलीने उघडकीस आनली. याप्रकरणी लता जंगम, सागर जंगम, महादेव जंगम, मनोज जंगम, मयूर जंगम, संदीप जंगम, उषा जंगम, वनिता जंगम, माधवी जंगम, सुषमा जगदाळे, शांता हिरेमठ, विजय जंगम, दिपाली जंगम, नितीन सरताळे, मंगल जगदाळे, शशिकांत जंगम, सुजाता जंगम, मंगल जंगम, वीरप्पा जंगम, कांताबाई जंगम, संतोष जंगम, विद्या जंगम, वैभव जंगम, विश्वनाथ जंगम,सुरेश जगदाळे,मंदा जमदाडे,शीतल जगदाळे, रा. मेढा, मोळेश्वर, कुमठे यांच्यावर बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह लावल्यप्रकरणी एवढ्या जणांवर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर लग्नामध्ये वर आणि वधू पक्षाकडून जे लग्नात पाहुणे मंडळी म्हणून आले होते. त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सपोनि. जीवन माने यांनी दिली. त्यामुळे संशयित आरोपींच्या संख्येत वाढ होणार आहे. यामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)