मेढ्यात नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय धरणे आंदोलन

मेढा ः आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी. (छाया : प्रसाद शेटे)

मेढा, दि. 16 (प्रतिनीधी) – राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मेढा शहरातील नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 15 डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने मेढा येथे कर्मचाऱ्यांनी शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यभरातील जवळपास 240 नगर परिषद व 110 नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
नगरपंचायतीचे जुने कर्मचारी यांना कायमस्वरूपी नगरपंचायतीमध्ये विना अट घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह सर्व कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायतीच्या कार्यकालापासूनचे दिवस धरण्यात यावेत, नगरपंचायत स्थापन झाल्यापासून जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना पेन्शन सुरू करण्यात यावी. ग्रामपंचायत सेवेमध्ये जे कर्मचारी मयत झाले आहेत त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नगरपंचायतीत घेण्यात यावे, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सवलती देण्यात याव्यात, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाद्वारे प्रशासनासमोर मांडल्या आहेत. या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास दि. 29 ते 31 डिसेंबरपर्यत काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येईल. आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर 1 जानेवारीपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये प्रमोद कुंभार, विकास जवळ, संजय जवळ, सचिन करंजेकर, राजू पुजारी, आशिष कुंभार, ऊल्गाप्पा पुजारी, ज्योती पुजारी आदींनी सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)