मेढ्यात कचऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर

ठोस उपाययोजनेची गरज, नागरिकांचा पुढाकार आवश्‍यक

मेढा – काही दिवसांपासून मेढा नगरपंचायतीमध्ये कचऱ्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावर नगरपंचायतीकडून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी प्रभाग 2 मधील अहिल्यादेवीनगरमध्ये केलेल्या डम्पिग ग्राऊंडमुळे आणि नगरसेवकांच्या अरेरावीपणामुळे हे कचऱ्याचे वादळ चांगलेच घोंगावले होते. यावर नागरिकांनी आत्मदहनाचा इशारासुद्धा दिला. परंतु, ही समस्या तात्पुरती सोडवण्यापेक्षा कायमस्वरूपी सोडवली तरंच नगरपंचायत कौतुकास पात्र होईल आणि नागरिक सुटकेचा श्‍वास घेतील. पण कशी सोडवाची ही समस्या? हा प्रश्‍न कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेढा शहरातला कचरा प्रभाग क्रं 2 मधील अहिल्यादेवी नगरमध्ये टाकला जात असेल तर नागरिकांनी त्याला विरोध केलाच पाहिजे. शहर स्वच्छ ठेवायचं आणि शहरातील घाण घराजवळ का सहन करायची? त्यासाठी शहराला कचरामुक्त करायला पाहिजे. शहर प्रशासन आणि तेथील लोकांची कचऱ्याबद्दलची मानसिकता बदलायला पाहिजे. मेढा नगरपंचायतीचा कार्यभार सांभाळताना ही शहर स्वच्छ कशी होतील आणि शहराजवळचं डंपिंग ग्राउंड कसं मिटवता येईल यावर भर दिला पाहिजे. डंपिंग ग्राउंडची जागा तात्पुरती बदलून ही समस्या सुटणार नाही. कचऱ्याची समस्या गंभीर असून दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे.

वर्गीकरण आवश्‍यक

मुळात नागरी घनकचरा ही समस्या नसून मिश्र कचरा ही समस्या आहे. 2000 सालापासून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि नागरी घनकचरा नियमानुसार शहरं स्वच्छ करण्याबाबत जनजागृती झाली. पण, संपूर्ण स्वच्छतेला खरा सूर सापडला नाही. शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्याची वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक वर्षांपासून लोकांना लागेलेली सवय लगेच जाणार नाही. त्यासाठी दररोज सकाळी रस्त्यांवर उतरून कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे लोकांना केवळ स्पीकरद्वारे सांगून हे काम शक्‍य नाही. त्यासाठी कडक नियम करावे लागतील. केवळ कागदोपत्री आदेश काढुन चालणार नाही तर त्याचा वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने नगरपंचायत प्रशासनाने अंमलबजावणी केली तर नक्कीच स्वच्छ सुंदर मेढा पहायला मिळेलच पण संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श नगरपंचायत म्हणून ही नावलौकिक वाढेल.

कचरा समस्येतील अपयशाची कारणे –
प्लास्टिकचा वाढता वापर
कचरा वर्गीकरणाचा अभाव
नागरिक, कर्मचारी यांच्यातील क्षमताबांधणीचा अभाव
कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांची उदासीनता


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)