मेढ्यात अर्धवट कामामुळे नागरिक हैराण

मेढा : बाजार चौक ते चांदणी चौक संथगतीने सुरू असलेले गटर आणि रस्त्याचे काम.

गटर, रस्त्याचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी
मेढा, दि 19 (प्रतिनिधी) – मेढा कमानी ते चांदणी चौक या मार्गावरील सिमेंट बंदिस्त गटार व रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. स्थानिक नागरिक रस्त्याच्या संथगती कामामुळे मेढा येथील रहिवासी हैराण झाले आहेत.
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि लक्ष्मी रोडवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या संथगती कामाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी अस्ताव्यस्त ग्रीट आणि खडी टाकल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मेढ्यातील अनेक प्रभागांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. तसेच मेढा येथील लक्ष्मी रोड परिसरात विविध भागांतून हजारो ग्राहक दररोज खरेदीसाठी येतात. त्यामुळे खासगी वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते.
बाजार चौक ते कमानी चौक येथे तीन महिन्यांपासून सुरू असलेले सिमेंट गटर व रस्त्याचे काम ठेकेदाराने लवकर पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सिमेंट गटारांचे कामाचे जे टप्पे पूर्ण झाले आहेत, तेथे लवकरच डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ज्या जोमाने आणि गतीने या कामाला सुरुवात झाली ती गती आता कमी झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे पूर्ण आठवडा भरात केवळ 15-20 मीटर गटर अशा संथगतीने सुरू आहे. डिसेंबर महिन्यात या कामांच्या भूमीपूजन वेळी मुख्याधिकारी साहेबांना 3 महिन्यात काम पूर्ण करू असे आश्वासन दिले दिले होते. परंतु, 3 महिने उलटून पण हे काम 50 टक्केही पूर्ण न झाल्याने नागरिक संतप्त आहेत. तर स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक हे या ठेकेदरांकडे दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न नागरिकांच्यात उपस्थित होतोय. नागरिकांना या भागात चालणे अवघड झाले आहे. रस्त्यावरील सगळी धूळ दुकानात येत असल्याने व्यापारी, रहिवासी हैराण झाले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)