मेढ्याच्या मोरया गोविंदा पथकाचा जिल्ह्यात बोलबाला

मेढा – गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, म्हणत मेढा येथील मोरया गोविंदा पथकाने जिल्ह्यातील 7 ठिकाणच्या दहीहंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत दहीहंडी स्पर्धेत आपला दबदबा जिल्ह्यात कायम राखला असून गेली 7 वर्षे मोरया गोविंदा पथकाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बक्षिसे मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

दहीहंडी म्हटले की एकोपा, जिद्द आणि आत्मविश्वास या तीन गोष्टींची गरज असते. या तिन्ही बाबी मोरया गोविंदा पथकाने कायम जोपासल्या असून या एकीच्याच बळावर 2011 पासून मोरया गोविंद पथकाने भरारी घेतली आहे. सुमारे 90 ते 100 तरुणांच्या या पथकाने आजपर्यंत सातारा, उंब्रज, कराड, फलटणसह सांगली जिल्ह्यातही अनेकदा 7 थरापर्यंत थर रचित प्रथम क्रमांकाची बक्षिसे पटकावली आहेत. या पथकातील अनेक तरुण हे व्यवसायानिमित्त मुंबई येथे असतात.

मात्र दहीहंडी स्पर्धेसाठी हे सर्व जण गावी येतात. कोणत्याही मदतीशिवाय 2011 साली गोविंदानीच वर्गणी गोळा करून गोविंदा पथक उभे राहिले. यावर्षी मेढा, सातारा व वाई अशा 3 ठिकाणी एकूण 7 स्पर्धेत मोरया गोविंदा पथकाने प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवून आपला ठसा उमटवला आहे. यावर्षी मेढा येथील मुख्य बाजार चौकातील दहीहंडी, वाई येथील मावळा प्रतिष्ठान, सातारा येथील विक्रम(पापा) पवार मित्र समूहाची छत्रपती दहीहंडी, मनसेची दहीहंडी, बाळासाहेब खंदारे मित्र समूह, दीपक पवार मित्र समूहाची भाजपाची दहीहंडी, राजे प्रतिष्ठान व रावण ग्रुपची भव्य दहीहंडी या सर्व दहीहंडी स्पर्धेत मोरया गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

या यशाबद्दल पथकातील गोविंदांचे भैरवनाथ युवा क्रीडा मंडळ,ग्रामस्थ मंडळ जवळवाडी, भैरवनाथ विकास मंडळ जवळवाडी, मेढा ग्रामस्थ यासह तालुक्‍यातील अनेक संस्था, मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)