मेढा भागात भात काढणीला वेग

मेढा ः मेढा परिसरात भात काढणीमध्ये मग्न झालेले शेतकरी.

मेढा, दि. 14 (वार्ताहार) – जावळी तालुक्‍यात व मेढा परिसरात भात काढण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. मनुष्यबळा अभावी शेतकऱ्यांना अनेक संकटांना समोरी जाव लागत आहेत. भात काढून झाल्यावर लगेचच भात झोडून भाताची पोती भरून घरपोच केली जातात. यावर्षी पावसामुळे भात चांगला आला होता व भाताचा उताराही चांगला मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहे.
परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जमिनीमध्ये पाणी असल्याने भात कापणी करताना कसरत करावी लागत आहे. चिखलात भात कापणी करताना खाचाराबाहेर काढून सुकायला घालावा लागत आहे. भात काढण्यास माणसे कमी पडत असल्याने शेतकरी एकमेकांना सहकार्य करून भात काढण्यास मदत करतात. या वेळी जवळचे नातेवाईक यांना भात कापणीसाठी बोलावतात. शेतमजूर वेळेवर मिळत नाही. जे उपलब्ध होतील, त्यांची मनधरणी करावी लागते. त्यांचे जेवण, रोजगाराचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागल्याने खर्चात वाढ झाली आहे.
छोट्या शेतकऱ्यांना खर्च परवडत नसल्याने स्वतः शेतात जावून कापणी करतात. तसेच मोठा शेतकरी यंत्रांच्या सहाय्याने भात कापणी करत आहे. परंतु यंत्राच्या सहाय्याने भात कापल्यास शेतकऱ्यांना जनावरांसाठी पेंढा मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी यंत्राचा वापर करत नाही. छोट्या शेतकऱ्यांना यंत्राचे भाडेच खर्च परवडत नाही व मजुरांचा खर्च परवडत नाही, त्यामुळे स्वत: भात कापणी करतात त्यमुळे गावोगावी शेतकर्याची भात काढणी साठी लगबग चालू आहे.

 

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)