मेढा चौक ते चांदणी चौक रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

मेढा ः प्रभाग क्र. 15 मधील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी महेश गायकवाड, द्रौपदा मुकणे, पांडुरंग जवळ आदी मान्यवर.

मेढा, दि. 27 (प्रतिनिधी) – संपूर्ण मेढ्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मुख्य बाजारपेठ प्रभाग क्रमांक 15 मधील मुख्य बाजार पेठ ते चांदणी चौक या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. सोमवारी मान्यवरांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन झाले.
मेढा चौक ते चांदणी चौक हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विकास देशपांडे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच सर्व नगरसेवकांकडून या रस्त्याबाबत सतत पाठपुरावा सुरु होता. परंतु, केवळ मुख्याधिकारी आणि आणखी काही तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. याबाबत दैनिक प्रभातमध्ये 13 नोव्हेंबर रोजी सविस्तर बातमी प्रकाशित झाली होती. तसेच नागरिकांमधूनही या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या सर्व बाबी लक्षात घेऊन याबाबत सतत पाठपुरावा करून, प्रशासकीय मंजुरी घेऊन या कार्याला मूर्त स्वरूप आणले असून सदरच्या रस्त्याचे काम पुढील 3 महिन्याच्या आत करून दाखवू तसेच मुख्य रस्त्याचे कामही लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी दिली.
या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्याधिकारी महेश गायकवाड, नगराध्यक्षा द्रौपदा मुकणे, उपनगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ, बांधकाम सभापती विकास देशपांडे, एकनाथ ओंबळे, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, नगरसेवक दत्ता अण्णा पवार, संतोष वारागडे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)