मेडिसिटी प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्री भावूक

नागपूर : ब्रिटिश सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने सुरू होणाऱ्या या मेडिसिटी प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रतन टाटा यांच्यासहीत अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. मुख्यमंत्री मेडिसीटी प्रकल्पाच्या उद्घाटना दरम्यान भावुक झाले. वडिलांच्या कॅन्सरच्या लढाईचा काळ आठवत त्यांनी नातेवाईकांची झालेली परवड सांगितली. नागपूरच्या मिहान प्रकल्पात मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी मेडिसिटी तयार करण्यात येणार आहे. देशातील ही पहिली मेडिसिटी असून अशा अजून 11 मेडिसिटी उभारण्याचा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. या मेडिसिटींमध्ये 50 लाखांचा उपचार पाच लाखात होतील. त्यामुळे वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)