मेडिकल कौन्सिल सदस्य समितीद्वारे डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्या चौकशीची मागणी

कोल्हापूर – शस्त्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पदवी नसतानाही रुग्णांची आर्थिक लुट करून रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉ. कोस्तुभ वाईकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या चार सदस्यांच्या समितीची नियुक्ती केली असून त्यांच्या माध्यमातून डॉ. कौस्तुभ वाईकर यांची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या विरोधातील तक्रारीच्या अनुषंगाने आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.

या लक्षवेधी सूचनेच्या सुरवातीपासून आमदार राजेश क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेत शासनाचे अधिकारी रुग्णांचे बळी घेणाऱ्या डॉक्टरांना पाठीशी घालण्यासाठी विधानसभेत चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. त्यांनी लक्षवेधी प्रश्नावर शासनाने दिलेल्या उत्तरावर आक्षेप घेतला. यावेळी लक्षवेधी मांडताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, महाराष्ट्र राज्यामध्ये उपचार किंवा शस्त्रक्रियेकरिता आवश्यक शैक्षणिक पदवी नसताना अनेक डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप देखील केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)