मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन व्हावे

सातारा – मेडिकल कॉलेजसाठी आवश्‍यक जागेचा प्रश्‍न सुटला आहे. ना.गिरीष महाजन यांच्याकडील वैज्ञकीय शिक्षण व जलसंपदा या दोन्ही खात्यांचा समन्वय साधला गेला आणि त्यामुळेच कृष्णा खोरे महामंडळाची जागा सहा महिन्यांपुर्वी मिळाली. मात्र, त्यानंतर मेडीकल कॉलेजचे घोडे पुढे सरकताना दिसून येत नाही आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरून प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून देखील गांभिर्याने पाठपुरावा होत नाही. परिणामी पुन्हा एकदा मेडीकल कॉलेजचा विषय मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची वेळ आली आहे.

माहितीनुसार, साताऱ्यातील मेडीकल कॉलेजचे काम वेळेत सुरू झाले नाही अन इंडियन मेडीकल कौन्सिलने मान्यता रद्द केली. तद्दनंतर तो प्रस्ताव नव्याने तयार करून मान्यतेसाठी कौन्सिलकडे पाठविण्यात आला आहे. तर, मेडीकल कॉलेजचे संपुर्ण काम पुर्ण झाल्यानंतर कौन्सिल मान्यता देणार आहे, अशी दुसरी माहिती पुढे येत आहे. त्याबाबत अद्याप शासनाच्यावतीने येथील जनतेला अधिकृत माहिती सांगण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच आता विषयाचा छडा लावण्याची गरज आहे. कारण, शासकीय रूग्णालयांमध्ये रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या पाहता रूग्णांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे.

त्याचाच परिणाम म्हणून मागील तीन ते साडे तीन वर्षात हजारो रूग्ण पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारासाठी पाठवावे लागले आहेत. या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मेडीकल कॉलेजची पायाभरणी तात्काळ करण्याची गरज आहे. मेडीकल कॉलेज सुरू झाले तर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचा आरोग्याचा प्रश्‍न निकालात निघणार आहे त्याचबरोबर सर्वसामान्य घरातील मुलांचे डॉक्‍टर होण्याचे देखील स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या विषयात लक्ष घालून आचारसंहितेपुर्वी निधीची तरतूद करून भूमीपूजन करावे, अशी येथील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)