पुणे : मेडिकलमधील सव्वा दहा लाखांच्या औषधांची चोरी

पुणे – मेडिकलच्या खिडकीची काच फोडून दुकानातील 10 लाख 19 हजार रुपयांची औषधे चोरल्याची घटना हडपसरमध्ये घडली. शंकर महाराज मठाजवळ असलेल्या शिवम कॉम्प्लेक्‍समधील एका मेडिकलमध्ये 28 मेच्या रात्री हा प्रकार घडला.

याप्रकरणी अपेक्षित अनिल नावंदर (वय 30, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे हडपसरमधील शंकर महाराज मठाजवळील शिवम कॉम्प्लेक्‍समध्ये मेडिकल आहे. 28 मेला रात्री चोरड्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाची ग्रील नसलेल्या खिडकीची काच कशाच्यातरी सहाय्याने फोडली. अन आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी एकूण दहा प्रकारची औषधे चोरली असून त्यांची किंमत 10 लाख 19 हजार 366 रुपये आहे. ही सर्व औषधे महागडी आहेत. 29 मेला सकाळी सुरक्षारक्षकाला चोरी झाल्याचे समजताच त्याने फिर्यादी यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानुसार नावंदर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)