“मेट्रो-2बी’च्या कामावरील स्थगिती कायम

मुंबई – “मेट्रो-2बी’च्या कामासाठी केवळ माती परीक्षण करा. बांधकाम करू नका, असे स्पष्ट आदेश देऊन न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी नकार देताना रेल्वेचे खांब उभारणीसाठी परवानगीही नाकारली. यामुळे मेट्रो 2 बीच्या कामातील अडथळा वाढत असून काम लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

मेट्रोच्या कामामुळे वाढत्या वाहतूककोंडीच्या पार्श्‍वभूमीवर एच वेस्ट वॉर्ड सिटीझन ट्रस्टच्या वतीने मेट्रोचे काम भुयारी करा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी होत असल्याने हा मार्ग भुयारी करावा अशी विनंती करताना

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेट्रो 2 बीचे काम पूर्व परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोप केला. या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय मेट्रो 2 बीचे कोणतही बांधकाम करून नका, असे निर्देश देऊन बांधकामाला स्थगिती दिली आहे. यावेळी एमएमआरडीएने बांधकामावरील बंधी उठविण्याबरोबरच रेल्वेंचे खांब उभारणीसाठी तपासणी करण्यास न्यायालयाकडे परवानगी मागणारा अर्ज दाखल केला. न्यायालयाने या अर्जावर 4 ऑक्‍टोंबर सुनावणी घेण्याचे निर्देश देताना बांधकामाला दिलेली स्थगिती कायम ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)