मेट्रो मार्गासाठी बीआरटी योजना गुंडाळली

संग्रहित छायाचित्र..

विद्यापीठ चौक ते बालेवाडी फाटा मार्गासाठी निर्णय

पुणे- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विद्यापीठ चौक ते बालेवाडी फाटा या मार्गावरील प्रस्तावित बीआरटी योजना गुंडाळण्यात आली आहे. या मार्गावरून पीएमआरडीएचा मेट्रोचा मार्ग जात असल्याने ही बीआरटी योजना रद्द केली आहे. त्याऐवजी विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल या मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विद्यापीठ चौक ते बालेवाडी फाटा या 8 किमी मार्गावर बीआरटी योजना राबवण्यात येणार होती. मात्र, पीएमआरडीएचा शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग याच रस्त्यावरून जात आहे. बीआरटी आणि मेट्रो असा जवळपास 5.5 किमी मार्ग एकाच रस्त्यावरून जात असल्याने बीआरटीचा खर्च वाया जाऊ शकतो. त्यामुळे या रस्त्यावरील बीआरटी रद्द करून आता विद्यापीठ चौक ते औंध येथील राजीव गांधी पूल या साडेतीन किमीच्या मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

ही योजना महापालिका करणार असून यासाठी 78 कोटींपैकी 43 कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेला देणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत यासंबधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे.
एकूण 3.5 किमीच्या या रस्त्याची रुंदी 45 मीटर इतकी आहे. त्यात बीआरटीसाठी साडेतीन मीटरच्या दोन लेनचा बीआरटी मार्ग असणार आहे. त्याचबरोबर या मार्गावर दोन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक. 1.9 मी रुंदीचा पदपथ आणि झाडे लावण्यासाठी दोन मीटर रुंदीचा समावेश असून एकूण 6 बसथांबे असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)