नवी दिल्ली: केंद्र सरकारने राज्यांना मेट्रो प्रकल्पांसाठी निधी हवा असल्यास काही नवी मार्गदर्शक तत्वे आणि नियम जाहीर केले आहेत. यात कोणत्या वस्तु कोठून खरेदी करायच्या याविषयीचेही काही नियम त्यांनी निश्‍चीत केले आहेत. या नियमांचे आणि सुचनांचे पालन केले तरच केंद्र सरकारकडून राज्यांना मेट्रो प्रकल्पांसाठी निधी दिला जाईल असे सरकाने म्हटले आहे.

मेट्रो प्रकल्पांच्या इलेक्‍ट्रीक उपकरणांसाठी, तेथे लावल्या जाणाऱ्या दिव्यांसाठी, वातानुकलीत यंत्रणा, लिफ्ट इत्यादी सेवांसाठीही केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वे निश्‍चीत केली आहेत. मेट्रोतील उपकरणांच्या आणि यंत्रणांच्या बाबती देशभर एकसमानता असावी यासाठी ही नियमावली तयार करण्यात आली असून या वस्तुंच्या देशांतर्गत उत्पादनांना चालना देण्यासाठीही हे नियम निश्‍चीत करण्यात आले आहेत असे सरकारच्या नगरविकास खात्याने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)