“मेट्रो…’चा सिक्वेल करण्यास परिणितीचा नकार

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अनुराग बासूद्वारा दिग्दर्शित ‘लाईफ इन अ मेट्रो’चा दुसरा भाग येणार आहे. अनुरागने स्वतःच काही दिवसांपूर्वी या सिक्वलची घोषणा केली होती. करिना, अर्जुन आणि राजकुमार रावनंतर आता या चित्रपटासाठी आणखी एका अभिनेत्रीची आवश्‍यकता होती. त्यासाठी परिणिती चोप्राला विचारणा करण्यात आली होती, पण परिणितीने त्यासाठी नकार दिला आहे. अलीकडेच अभिनेत्री परिणिती चोप्राचा ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट रिलीज झाला. पण बॉक्‍स ऑफिसवर हा चित्रपट फारशी चमक दाखवू शकला नाही. या चित्रपटापूर्वी परिणीतीच्या नावाची ‘लाईफ इन मेट्रो’ या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी चर्चा होती. पण हा चित्रपट करण्यास परिणीतीने नकार दिला आहे.

येत्या काळात अक्षय कुमारच्या ‘केसरी’ आणि सिद्घार्थ मल्होत्रासोबत ‘जबरिया जोडी’ या चित्रपटात परिणिती मुख्य भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्हीही चित्रपटांचे पोस्टर रिलीज करण्यात आल्यामुळे तिच्या ‘लाईफ इन मेट्रो’च्या सिक्वेलसाठी तारखांचा जम बसत नसल्याने तिने हा चित्रपट सोडला आहे. सध्या ‘केसरी’च्या शूटिंगमध्ये परिणिती चोप्रा व्यस्त आहे. या चित्रपटाचे बरेचसे भाग नव्याने तयार करण्यात येत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मेट्रो…’च्या सिक्‍वेलसाठी आता या चित्रपटात दंगल गर्ल फातिमा सना शेख झळकणार असल्याचे समोर आले आहे.
‘लाईफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट जवळपास 11 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात चार शहरांतील चार वेगवेगळ्या कथा दिग्दर्शकाने उत्तमरीत्या पडद्यावर उतरवल्या होत्या. या सिक्वलमध्येही आता अशाच प्रकारच्या कथा पाहायला मिळणार आहेत. विशषे म्हणजे चित्रपटासाठीची सगळीच स्टारकास्ट तगडी आहे. करिना कपूर, अर्जून कपूर, राजकुमार राव, अभिषेक बच्चन, इलियाना डिक्रूझ सारखे कलाकार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

परिणितीचा “संदीप और पिंकी फरार’ च्या शुटिंगचे कामही याच आठवड्यात सुरू होणार आहे. गमतीची बाब म्हणजे परिणितीने एका इंटरव्ह्यूमध्ये टेलिपत्रकार अर्णब गोस्वामीबरोबर काम करणार असल्याचे सूतोवाच केले होते. ती आता काय बातम्या देण्याचे काम करणार का, असा प्रश्‍न तिच्या फॅन्सला पडला आणि त्यांनी तिला ट्रोलही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)