मेट्रो कामाची गती आणखी वाढणार

वृक्षप्राधिकरण समितीची वृक्षतोडीची परवानगी


106 झाडांचे पुनर्रोपन करण्यासही मान्यता

पुणे – महामेट्रोच्या वनाज ते धान्य गोदाम या मार्गासह, धान्य गोदाम ते रामवाडी या मार्गात येणाऱ्या 172 झाडांपैकी 106 झाडांच्या पुनर्रोपनास महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे या वनाज ते धान्यगोदाम या मार्गातील काही खांब तसेच स्थानकांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्पाधिकारी अतुल गाडगीळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पौड रस्त्यासह, नदीपात्रात मेट्रोप्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यातील वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी या ठिकाणी मेट्रोच्या स्टेशन आणि मेट्रो मार्गाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामादरम्यान काही वृक्षांचा अडथळा होत आहे. वृक्ष प्राधिकरणाने पुनर्रोपित करण्यासाठी परवानगी दिलेल्या 106 पैकी पौड रस्त्यावरील काही वृक्षांचा समावेश असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामेट्रोने 7 जुलै 2017 रोजी वृक्षप्राधिकरणाकडे मेट्रो मार्गात येणाऱ्या वृक्षांच्याबाबत प्रस्ताव मांडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत यावरून महापालिका आणि महामेट्रो यांच्यामध्ये प्रस्ताव आणि परवानगी वरून वाद सुरू होता. मेट्रो बांधकामामध्ये वनाज ते रामवाडी या मार्गादरम्यान एकूण 172 वृक्षांचा अडथळा होत आहे. यापैकी एकही वृक्ष तोडला जाणार नाही, अशी हमी महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. त्यानुसार वृक्ष पुरर्रोपनाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)