मेट्रो करू लागली रस्ता मोकळा

पिंपरी – शहरात सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने चिंचवड ते दापोडीपर्यंतचा बहुतेक रस्ता रोखण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू असल्याने ठिक-ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. परंतु वेगाने काम करत असलेल्या मेट्रोने काम आटोपून रस्ता मोकळा करण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रोने एचए कंपनीसमोरील 540 मीटर लांबीच्या रोडवरचे बॅरिकेट्स काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे.

पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिका एकच्या कामासाठी जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर दोन्ही बाजूला रस्ता बॅरिकेट्स लावून रस्ता अडवण्यात आला होता. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी नऊ मीटर जागेची गरज भासते. यासाठी रोडच्या मध्यभागी 4.50 मीटर जागा घेऊन बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुभाजकाजवळ दोन्ही बाजूला 4.30 मीटर जागा घेऊन तात्पुरत्या स्वरुपात घेऊन मेट्रोने पायाभरणीचे काम पूर्ण केले. सध्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील बहुतेक खांब उभे करण्यात आले आहेत. सध्या सेगमेंट लॉंचिंग काम प्रगतीपथावर आहे. जिथे काम पूर्ण केले आहे तिथे रस्ता मोकळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एचए कंपनीसमोरील 540 मीटर लांबीच्या रोडवरचे बॅरिकेट्स काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)