मेट्रोसाठी वृक्षतोडीच्या निषेधार्थ पुन्हा आंदोलन

पुणे – नगर रस्त्यावरील मेट्रोच्या सुधारित मार्गात अडथळा ठरणारी सुमारे 200 झाडे काढली जाणार आहे. महामेट्रोने ही कार्यवाही सुरू करताच या भागातील नागरिकांनी शनिवारपासून पुन्हा निदर्शने सुरू करण्यात आली आहेत.

आगाखान पॅलेस हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याने महामेट्रोने या नगर रस्त्यावरील मेट्रो मार्ग कल्याणीनगरमधून वळविला आहे. या मार्गात प्रकल्पास कोणताही अडथळा नसला, तरी या मार्गातील लहान-मोठी अशी सुमारे 200 झाडे काढावी लागणार आहेत. त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यानंतर मागील आठवड्यात कल्याणीनगर येथील नागरिकांनी महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रह्मण्यम्‌ यांची भेट घेऊन कल्याणीनगर येथून जाणाऱ्या मेट्रोला विरोध दर्शवत काम थांबविण्याची विनंती केली होती. त्यावेळी सुब्रह्मण्यम्‌ यांनी ताबडतोब मेट्रोचे काम थांबवण्याची हमी दिली होती. मात्र, शुक्रवारी (दि.4) रात्रीपासून या परिसरातील वृक्षतोडीचे काम सुरू करण्यात आल्याने येथील नागरिकांनी शनिवारी (दि.5) आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी “मेट्रो, सरळ मेट्रो, सोपी मेट्रो, आपली मेट्रो’ “आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मेट्रोवर तडजोड नाही’, “येरवडा ते रामवाडी भुयारी मेट्रो’ असे फलक हाती घेत नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)