मेट्रोला चार एफएसआय नको

संग्रहित छायाचित्र

स्वयंसेवी संस्थांची मागणी : पीएमआरडीए मेट्रोची गरजच काय?

पुणे – शहरामध्ये पीएमआरडीएकडून करण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची मुळात आवश्‍यकताच नाही. या मेट्रोला कोणतीच प्रवासी संख्या मिळणार नाही. त्याचबरोबर शहरातील तीन मेट्रो प्रकल्पांना चार एफएसआय देवू नये, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पत्रकार परिषदेत केली.

-Ads-

या पत्रकार परिषदेला खासदार वंदना चव्हाण, अनिता बेनिंझर, सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर हे विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे शहरामध्ये तीन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी महामेट्रो कंपनीकडून वनाज ते रामवाडी, निगडी ते स्वारगेट हे मार्ग करण्यात येत असून काम प्रगतीपथावर आहे. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या 22 किलोमिटर मेट्रोचे काम करण्यात येणार आहे.

पुणे शहरामध्ये जर मेट्रो प्रकल्पासाठी चार एफएसआय देण्यात आला तर, पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येणार आहे. केवळ पीएमआरडीएच्या एका मार्गामुळे शहामध्ये 35 लाख लोकसंख्या पुढील काही वर्षांमध्ये वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर या लोकसंख्येला 500 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा दररोज करावा लागणार आहे. पुणे शहरामध्ये सध्या एकरी 102 असे लोकसंख्येचे प्रमाण आहे. शहरामध्ये मेट्रोचा एफएसआय वाढला तर, एकरी 622 माणसे असे प्रमाण होईल. त्यामुळे सिमेंटची जंगले वाढून शहरे बकाल होतील, असे बेनिंझर म्हणाल्या.

एफएसआयचा व्यवसाय
पुणे शहरामध्ये मेट्रोसाठी चार एफएसआय देण्यापेक्षा फक्त मेट्रो स्टेशनसाठी चार एफएसआय देण्यात यावा. त्यामुळे शहरावर ताणच येणार नाही. शहरामध्ये पीएमआरडीएच्या मेट्रोला प्रवासीच मिळणार नाहीत. केवळ एफएसआयचा व्यवसाय करायचा असल्यामुळे हा घाट घालण्यात आला असल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)