मेट्रोलगत चार एफएसआय?

नागपूर मेट्रोला मान्यता; पुण्यासाठीही हाच निर्णय देण्याची शक्‍यता

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आणि पुणे महानगरपालिकेने मेट्रोचे काम हाती घेतले आहे. नागपूरमध्ये मेट्रोच्या मार्गांच्या दोन्ही बाजूस सरसकट चार एफएसआय देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नागपूर मेट्रोच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गालगत नागपूरचा नियम लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागपूर महापालिकेकडून मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोकडून सुरू आहे. नागपूर येथे मेट्रो मार्गांच्या लगत सरसकट चार एफएसआय देण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्य सरकारकडून नुकतीच त्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, पुणे महापालिका आणि पीएमआरडीएने देखील मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. मेट्रो मार्गांच्या दोन्ही बाजूस सरसकट चार एफएसआय द्यावा की, मेट्रो स्टेशनच्या परिसरात द्यावा याबाबत दोन्ही संस्थांचे वेगवेगळे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत.

पुणे महापालिकेच्या वतीने वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या मार्गावरील दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या परिसरात सरसकट चार एफएसआय देण्याचा (टीओडी झोन) निर्णय पुणे महापालिकेने यापूर्वी घेतला होता. जानेवारी 2017 मध्ये पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. त्यामध्ये देखील ही तरतूद होती. मात्र, या भूमिकेत ऐनवेळी बदल करीत केवळ मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी नॅशनल टीओडी पॉलीसीचे कारण महापालिकेकडून पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेली अनेक बांधकामे रखडली आहे.

दरम्यान, पीएमआरडीएने त्याच पॉलिसीचा आधार घेत हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या परिसरात सरसकट चार एफएसआय देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे महापालिका अडचणीत आली होती. नागपूर मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित होता. त्यामुळे तिन्ही शहरांतील मेट्रोंसाठी राज्य सरकारकडून एकच पॉलिसी लागू केली जाईल, असे सांगण्यात येत होते. नागपूर मेट्रोच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गालगत नागपूरचा नियम लागू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

“टीओडी’ अंमलबजावणीचे अधिकार शासनाला
नॅशनल टीओडी पॉलिसी जरी असली तरी त्यांची अंमलबजावणी कशी व कोणत्या पद्धतीने लागू करावी, यांचे अधिकार राज्य सरकारला आहे. या पॉलिसीच्या अंतर्गतच राज्य सरकारने नागपूरची टीओडी पॉलिसी लागू केली आहे.

पीएमआरडीएने देखील टीओडी झोनमध्ये सरसकट चार एफएसआयची मागणी केली आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)