मेट्रोच्या कामासाठी ‘5डी’ बीम तंत्रज्ञान

पुणे – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असा मेट्रो रेल्वेचा मार्ग साकारला जात आहे. 11 हजार 420 कोटी खर्च होणाऱ्या 31.254 कि.मी.च्या या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महामेट्रोने स्वीकारलेल्या “5 डी’ बीम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. एकाच ठिकाणी प्रकल्पाच्या सर्व दैनंदिन कामाचा आढावा तसेच प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती मिळावी, या उद्देशाने हे तंत्रज्ञान वापरण्यात येते. दरम्याम, महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स पर्यंतचे काम वेगाने होणार आहे.

काय आहे 5 डी बीम तंत्रज्ञान
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात साकारला जात असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामात कुठलीही चूक होऊ नये, यासाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशात पहिल्यांदाच 5 डी बीम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खर्चापासून ते वेळेच्या नियोजनावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या सिव्हील कोर्ट येथील कार्यालयात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. सुरुवातीला एखाद्या प्रकल्पासाठी कागदावर नोंदी घेतल्या जात होत्या. पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या कामांत अनेक चुका राहायच्या आणि यामुळे प्रकल्पाचे काम रेंगाळायचे. 5 डी-बीममुळे संपूर्ण प्रकल्पांचे अपडेट एकाच ठिकाणी प्राप्त होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)