मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी; प्रशासनाचा कानाडोळा

पिंपरी – पुणे मेट्रोच्या कामाचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत असून, पिंपरी चौकात वाहतूक संथ झाली आहे. मात्र, पोलीस आणि मेट्रो प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पिंपरीकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटी मार्गाच्या बाजुला पत्रे लावले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी जेमतेम 10 ते 15 मीटरचा रस्ता उरला आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत असून, रस्त्यावरच पीएमपी बसथांबा असल्याने वाहनांची एकच कोंडी होत आहे.

रस्त्याच्या कडेला वेडे-वाकडे उभे असलेले रिक्षा वाहतूक कोंडीत आणखीच भर टाकत आहेत. एवढ्या कोंडीतून वाट काढून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या बाजुचे पेव्हिंग ब्लॉक उखडले असून, त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेली कोंडी एचएपर्यंत असते. पुण्याकडुन पिंपरीकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट असून, पिंपरी चौकाच्या अलीकडे असलेल्या कंपन्या समोर वाहणे उभी असतात. या रस्त्यावर बॅंका आणि इन्शुरन्स कंपन्या असल्याने येथे मोठ्याप्रमाणात लोक आपली वाहणे नो पार्किंग च्या फलकाला न जुमानता तिथेच लावतात. मात्र, पोलीस त्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पदपथाचा वापर वाहणे लावण्याकरीता केला जात आहे. त्यामुळे पदचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे. चिंचवड वाहतूक पोलीस आणि मेट्रो प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवावा, अशी मगणी नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)